महाराष्ट्रामध्ये ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

    दिनांक  17-May-2020 13:24:48
|

mumbai_1  H x W
 
 
मुंबई : देशामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधीताची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील लॉकडाऊन हा ३१ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजारांच्या वर गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा रविवारी ५४वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा दिवस होता. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरु होणार आहे.
 
 
lockdown_1  H x 
 
 
 
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३०,७०६ वर गेली आहे. तसेच. आत्तापर्यंत ७,०८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त, राज्यामध्ये आत्तापर्यंत १,१३५ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होईल. त्यामुळे आता पुढील १४ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. दरम्यान, या लॉकडाउन चारमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. परंतू, रेड झोनमध्ये अधिक काळजी घेतली जाणार आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.