बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला देखील आंदोलन करावे लागेल : प्रविण दरेकर

16 May 2020 14:47:45

praveen darekar_1 &n



बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रविण दरेकरांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना पाठींबा देत विधान परिषदेचे विरोधीपक्ष आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हालाही मानवतेच्या भावनेतून त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे. बेस्टच्या १०८ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.




कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सध्या लॉकडाऊन लागू आहे. पण लॉकडाऊनच्या या नियमांमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. रेल्वे आणि अन्य वाहतूकदेखील या काळात बंद ठेवण्यात आली आहे. मात्र महानगरी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टचा या अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे बेस्टची सेवा या कठिण काळातही सुरू आहे.


अशा कठीण परीस्थित काम करताना काही बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा बेस्ट संघटनांनी दिला होता.





प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून कार्यरत असणारे बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढत आहेत. तर त्यांचे ऐकायला हवे! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी. त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हालाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावे लागेल, असे म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0