हिंदीनंतर श्रीशांत आता करणार मराठी चित्रपट!

    दिनांक  16-May-2020 14:13:57
|

S sreesanth_1  
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत आता मराठी चित्रपट करत असल्याची माहिती त्याने दिली. एका अॅपवर लाईव्ह येत श्रीशांतने ही घोषणा केली. श्रीशांत गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणाला की, “आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापैकी ही सर्वोत्तम भूमिका असणार आहे. या मराठी चित्रपटाचे नाव 'मुंबईचा वडापाव' आहे. या चित्रपटाची शुटींग पुणे आणि नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे.”
 
 
क्रिकेटमध्ये एस. श्रीशांतवर बंदी घातल्यानंतर त्याने अभिनयाची वाट धरली. २०१७ मध्ये श्रीशांत 'अक्सर २' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच श्रीशांतने लोकप्रिय 'बिग बॉस' या रिअॅणलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. हिंदीसोबातच त्याने मल्याळम, कन्नडा भाषेमधील चित्रपटही कामे केली आहेत. तसेच काही प्रसिद्ध रियालटी कार्यक्रमामध्येही त्याने आपले नशीब आजमावले आहे. आता त्याची पाउले मराठी चित्रपट क्षेत्राकडे वळली आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.