अभिजीत बिचुकलेंचे थेट पंतप्रधानांना पत्र!

    दिनांक  16-May-2020 16:52:23
|

Abhijeet Bichukle_1 


अजब-गजब बिचुकलेंचे पंतप्रधान मोदींना अजब-गजब सल्ले 


मुंबई : कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी झोतात आलेले अभिजीत बिचुकले सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. स्वतःला ‘कवी मनाचे नेते’ म्हणणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहित सल्ला दिला आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असताना अभिजीत बिचुकलेंनी दिलेले हे सल्ले आणि या पत्रामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकलेच्या नावाचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या, अशी विनंती या पत्रातून अभिजीत बिचुकलेने नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. १५ वर्षाखालील मुले ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवावीत, अशी मागणी बिचुकलेने या पत्रातून केली आहे.


अनेक राज्यात नववीपर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब होतो. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. शाळा सुरु झाल्या तर खेळण्याच्या नादात मुले सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत. त्यामुळे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असेही बिचुकलेंनी म्हटले आहे.
letter_1  H x W
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.