ऑस्ट्रलियासोबत मोठी कसोटी मालिका अशक्यच : सौरव गांगुली

    दिनांक  16-May-2020 15:07:14
|

Sourav Ganguly_1 &nb
नवी दिल्ली : सध्या जगभरामध्ये कोरोनाचे वारे फोफावते आहे. अशामध्ये सर्वच क्रीडा सामने थांबले आहेत. सध्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रलिया दौऱ्यावर बऱ्याच हालचाली होत असल्याचे समोर आले. २०२०च्या शेवटच्या मोसमामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी ‘चार सामन्यांऐवजी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रस्ताव स्वीकारणे शक्य होणार नाही, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे.
 
 
 
क्रिकेट ऑस्ट्रलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी भारतासोबत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सौरव गांगुलीने सांगितले की, "ऑस्ट्रेलियामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे भारताला अशक्य आहे, असे मला वाटत नाही. मर्यादित षटकांची मालिकादेखील आहे आणि आम्हाला १४ दिवसांच्या क्वारंटाईन नियमांचे पालनही करावे लागेल.”
 
 
बीसीसीआयसोबत असलेल्या संबंधांचा उल्लेख करताना रॉबर्ट्स म्हणाले, होते की पाच सामन्यांची मालिका निश्चित नसली तरी शक्य होऊ शकते. “येत्या हंगामात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांबाबत काही निश्चितता नाही, परंतु मी असे म्हणू शकतो की बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांचे खूप चांगले नाते आहे. भविष्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याबद्दल चर्चा झाली आहे.” असे क्रिकेट ऑस्ट्रलियाचे रॉबर्ट्स म्हणाले होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.