आशा भोसलेंनी सुरु केले स्वतःचे युट्युब चॅनल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

aasha bhosale_1 &nbs


श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास गाणं पोस्ट करत केला चॅनलचा शुभारंभ


मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी स्वतःचे युट्युब चॅनल सुरु केले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी डिजिटल विश्वातील त्यांच्या या पर्दापणाचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. चॅनल लॉन्च संदर्भात बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, "सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकजण घरात कैद आहे. त्यामुळे घरात खूप काळ नातवंडांना इंटरनेट विश्वात मुक्त संचार करताना पाहून मलाही एका नव्या विश्वाचा प्रत्यय आला.” बुधवारी रात्री आशा भोसले यांनी युट्युब चॅनल लॉन्च केले. यासाठी त्यांना त्यांच्या नातीने प्रोत्साहित केल्याचे त्यांनी सांगितले.


"अनेक वर्षांपासून मी माझे विचार, अनुभव आणि भावना व्यक्त कराव्यात यासाठी मागणी होत होती. मात्र या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. आता घरी असल्यामुळे ८६ वर्षांचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे लोकांचे मनोरंजनही होईल. त्यांचा काही वेळ आनंदात जाईल. काही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल." असेही त्या म्हणाल्या. परंतु, युट्युब चॅनल लॉन्च करण्याचे श्रेय आशाताई संपूर्णपणे आपल्या नातीला देतात.


युट्युब चॅनलची माहिती आशा भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचे 'मैं हूं' गाणे गाऊन त्यांनी चॅनलचा शुभांरभ केला.




@@AUTHORINFO_V1@@