ठाकरे सरकारला जाग कधी येणार? ; राम कदम यांचा सवाल

15 May 2020 15:52:41

KEM Hospital_1  
मुंबई : सध्या मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे सिद्ध झाले आहे. अशामध्ये मुंबईमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत असल्याचे व्हिडियो समोर येत आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी केईएम रुग्णालयातील एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना जमिनीवर बसवल्याचे चित्र दिसत आहे. तर डॉक्टरांचे त्यांच्याकडे लक्ष नसल्याचेही या व्हिडियोमधून समोर आले आहे. यावर ‘ठाकरे सरकारला कधी जाग येणार?’ असे राम कदम यांनी खडसावले आहे.
 
 
 
 
“केईएम रुग्णालयात रुग्णांना खाली बसण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं काय? काहीच नाही का? अत्यंत दुःखद बाब.. महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार?” असे ट्विट भाजप नेते राम कदम यांनी सोबत व्हिडियोही शेअर केले आहे. या व्हिडियोमध्ये अनेक रुग्ण जमिनीवर बसल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मध्ये स्ट्रेचरवरुन रुग्णांना घेऊन जाता आहेत, मात्र खाली बसलेल्या रुग्णांकडे कोणाचेच लक्ष नाही आहे. असे विदारक चित्र सध्या आर्थिक राजधानी असलेल्या रुग्णालयांची आहे. याआधीदेखील सायन रुग्णालयातील कोरोणाग्रस्तांचे हाल होत असलेला व्हिडियो वायरल झाला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0