नेमबाजी महासंघाकडून अंजुम मोगदीलची ‘खेलरत्न’साठी शिफारस

    दिनांक  15-May-2020 20:46:06
|

awards_1  H x W
मुंबई : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिग्गज नेमबाज अंजूम मोगदिलच्या नावाची शिफारस नेमबाजी महासंघाकडून करण्यात आली आहे. तसेच, प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या नावाची सलग दुसऱ्यांदा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यत आली आहे. तर महासंघाकडून अर्जुन पुरस्कारांसाठी नेमबाज सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांची नावे पाठविली आहेत.
 
 
अंजुम मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली. २०१९मध्ये अंजूम आणि दिव्यांश पंवार यांनी म्युनिच आणि बीजिंगमध्ये विश्वचषकात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकले होते. तसेच, मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीश भानवाला या खेळाडूंच्या जडणघडणीमध्ये प्रशिक्षक जसपालची यांची महत्त्वाची भूमिका आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी यांच्या नावावर एकमताने निर्णय झाल असल्याची माहिती मिळत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.