लवकरच सुरु होणार ‘या’ टीव्ही मालिकांचे चित्रीकरण!

    दिनांक  14-May-2020 13:55:55
|

Serial shoot_1  सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत पार पडणार चित्रीकरण!


मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.


चित्रपटांचे चित्रीकरण जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. जुलै महिन्यात चित्रीकरणाला जर परवानगी मिळाली, तर चित्रिकरणाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे.


दरम्यान, आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण गेले जवळ जवळ दीड महिना बंद आहे. मात्र आता नवीन एपिसोडचे चित्रीकरण सुरु होत असल्याचे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयचे अध्यक्ष बी. एन तिवारी यांनी माहिती देताना सांगितले आहे.


यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत ती पाळून शुटींग सुरु केले जाणार आहे. त्यात एकता कपूरच्या ‘भाभीजी घर पर है’, सोनीचे काही रियालिटी शो आणि ‘केबीसी’च्या चित्रीकरणाचा समावेश आहे. यासाठी उपस्थित कर्मचारी आणि निर्माते यांना काही अटी पाळाव्या लागणार आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.