जेव्हा सचिन सौरव आयसीसीची फिरकी घेतात...

    दिनांक  14-May-2020 20:27:59
|

sachin sourav_1 &nbs
मुंबई : सध्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा विश्व थांबले आहे. मात्र, सोशल मिडियाद्वारे सर्व खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सचिन सौरव ही जोडगोळी अद्यापही खूप जणांचा आदर्श आहे. या दोघांच्या भागीदारीमुळे भारताला अनेक विजय मिळाले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन आणि गांगुलीने १७६ वेळा भागीदारी रचत ८२२७ धावा केल्या आहेत. याच संदर्भात आयसीसीने केलेल्या ट्विटवर दोघांनीही गमतीशीर उत्तर दिले.
 
 
 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या ट्विटरवर या दोघांची आकडेवारी पोस्ट केली आणि लिहिले, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली म्हणजे १७६ वेळा दमदार भागीदारी, ८२२७ धावा आणि सरासरी ४७.५५. इतर कोणत्याही जोडीने एकदिवसीय सामन्यात ६०००चा टप्पा ओलांडला नाही.”
 
 
 
 
 
या ट्विटला सचिन-गांगुलीने गमतीशीर उत्तर दिले आहे. सचिन म्हणाला, “ही आठवण खूपच मस्त आहे, दादा. पण तुला काय वाटते, आयसीसीच्या नव्या नियमानुसार ३० यार्डच्या वर्तुळाबाहेर ४ खेळाडू आणि २ नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?” सचिनच्या ट्विटवर गांगुली म्हणाला, ''अजून चार हजार धावा आपण नक्की केल्या असत्या. सामन्यात दोन नवे चेंडू, ऐकायला खूप मस्त वाटत आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू संपूर्ण सामनाभर सीमारेषेपार जाताना दिसतो आहे.''
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.