शक्यतो कोरोना विषाणू कधीच जाणार नाही, या सोबत जगायला शिका : WHO

14 May 2020 11:22:18
WHO_1  H x W: 0






जेनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी कोरोना कधीही न संपणारी एक महामारी बनू शकते, असा दावा केला आहे. जगाने आता या सोबत जगण्याची तयारी करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. एचआयव्ही संपला नाही तरीही आपण त्या संकटासोबत जगतो आहोत, तसाच कोरोनाही आहे, असे ते म्हणाले. या दोन आजारांची तुलना होऊ शकत नाही आणि ती मी करतही नाही मात्र, आपण वास्तव स्वीकारायला हवे, कारण सध्या कोरोना कधी संपुष्टात येईल, याची शक्यता सध्या तरी कुणीही व्यक्त करू शकत नाही.


कोरोनावर लस कधी येणार ?


जगभरात शंभरहून अधिक ठिकाणी कोरोना लस तयार करण्यावर काम सुरू आहे. कोरोनाची लस तयार झाल्यानंतर सर्वांना सहज उपलब्ध व्हायला हवी याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. ती लस अधिक परिणामकारक असणे गरजेचे आहे. आजही आजारांवर लस उपलब्ध असली तरीही आपण त्यावर मात करू शकलेलो नाही, असेही ते म्हणाले.



कोरोना संक्रमणाचा दर खालावल्यास निर्बंध हटवा


डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, कोरोना संक्रमणाची नवी उदाहरणे पुढे येत आहेत. अशातच निर्बंध हटवले तर हा आजार पुन्हा नव्याने डोके वर काढण्याची भीती आहे. पुन्हा एकदा व्यापक प्रमाणावर लॉकडाऊन घ्यावे लागेल, अशीही शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा कोरोना संक्रमणाचा आलेख घटेल, नवे रुग्ण आढळण्याचा दर कमी होईल, तेव्हाच लॉकडाऊन शिथिल करायला हवे, तरच संक्रमणाचा पुढील धोका टळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.



Powered By Sangraha 9.0