चिंताजनक : महाराष्ट्रात तब्बल १००१ पोलिसांना कोरोनाची लागण

14 May 2020 14:56:11

Corona police_1 &nbs



राज्यात आतापर्यंत ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर पोलिस दलातील कर्मचारी अहोरात्र गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण १००१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.


महाराष्ट्र पोलीस दलातील १ हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी ८५१ अद्याप उपचार घेत असून, १४२ जणांची प्रकृती सुधारली आणि ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या २१८ घटना राज्यात घडल्या असून, अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत ७७० आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी सु्द्धा महाराष्ट्र सरकारने पोलीस, डॉक्टरांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सुचना दिल्या होत्या. तरीही पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे
Powered By Sangraha 9.0