राज्यपालांसंदर्भात बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल

    दिनांक  14-May-2020 22:31:28
|

governour_1  H


मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटे व बदनामीकारक वृत्त एका वेबपोर्टलवर प्रसिद्ध करून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई पोलीसांच्या सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदविण्यात आली.


एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याचे असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलने प्रसिद्ध केले होते, या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.