'या' भागातील कोरोना रुग्ण पळाला : शोध सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020
Total Views |
ambulance_1  H






रत्नागिरी
: लघुशंकेचा बहाणा करून कोरोना रुग्ण पळाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे घडली आहे. बुधवारी दापोलीत चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आणण्यासाठी रुग्णवाहिका गावात गेल्या होत्या. 


संकुर्डे आणि सडवे येथील रुग्ण घेऊन आले पण तालुक्यातील बोरीवली गावात रूग्णवाहिका गेल्यावर तिथल्या रुग्णाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया क्वारंटाईन ठिकाणी सुरु झाली. बोरीवली ग्रामस्थांनी अतिशय उत्तम काळजी घेत तेथील शाळेत सगळ्यांना ठेवले आहे, जवळपास २८ जणांना येथे ठेवले असून त्याच ठिकाणी हा पॉझिटिव्ह रुग्ण होता लघुशंकेला जाऊन येतो असे सांगून तो पळून गेला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने त्याला पकडणार कसे अशी स्थिती उपस्थितांची झाली. त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा शोध सध्या सुरू आहे.



दरम्यान, सकाळपासून पुणे व मुंबई परिसरातील शेकडो नागरिक दापोलीत दाखल झाले आहेत. प्रशासनातर्फे त्यांच्या आरोग्य तपासणीची चोख व्यवस्था डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील शेतकरी भवन येथे करण्यात आली आहे.मात्र प्रचंड गर्दी असल्याने किसान भवनच्या गावाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या संपूर्ण परिस्थितीवर दापोलीचे तहसीलदार समीर घारे जातीने लक्ष ठेऊन आहेत.



@@AUTHORINFO_V1@@