साधूंचे मारेकरी सीपीएम व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते : सीआयडी कारवाईत समोर आले सत्य

    दिनांक  14-May-2020 14:45:42
|
Palghar Sadhu Murder Case
 चार आरोपींना अटक : पालघर झुंडबळी प्रकरणात मोठी कारवाईपालघर (विशेष प्रतिनिधी) :
पालघरमधील गडचिंचले या ठिकाणी झालेल्या साधूंच्या हत्याकांडात स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे समोर आले आहे. सीआयडीकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सीपीएम  व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 
 


साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात सीपीएम पक्षाचा कार्यकर्ता विष्णू भावर साधूंना मारताना दिसतो. विष्णू भावर याला सीआयडी ने ताब्यात घेतलं आहे. राजेश राव, विनोद राव व रामदास राव या तिघांनाही सीआयडीकडून अटक करण्यात आली. राजेश राव, विनोद राव आणि रामदास राव तिघेही सीपीएमचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समजते. दरम्यान जाणक्या बोरसा नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा साधूंना मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जाणक्या बोरसा यालाही सीआयडीने ताब्यात घेतले आहे. सारा प्रकार गैरसमजातुन घडला व यात राजकीय सहभाग नाही, अस वारंवार सांगणाऱ्या सर्वांचे पितळ या अटकेच्या कारवाईमुळे उघडे पडले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.