आनंदवार्ता ! कोरोनाबाधित गर्भवतींनी दिला सुदृढ बाळांना जन्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020
Total Views |


new born baby_1 &nbs


मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात बुधवारी चांगली घटना ऐकायला मिळाली. या रुग्णालयात बुधवारी शंभराव्या कोरोनाबाधित महिलेने कोरोनाचा संसर्ग नसलेल्या सुदृढ बाळाला जन्म दिला. बुधवारपर्यंत १०३ कोरोनाबाधित महिला या रुग्णालयात प्रसूत झाल्या. मात्र त्यांच्या उदरी जन्मलेल्या बाळांना कोरोनाचा स्पर्शही झाला नाही. ही सर्व सायन रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या मेहनीतीची किमया आहे.



गेले आठवडाभर सायनचे लोकमान्य टिळक रुग्णालय या ना त्या कारणांनी गाजत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या बाजूलाच इतर रुग्णांवर उपचार चालू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सायन रुग्णालय व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली. त्यामुळे या रुग्णालयाची कुप्रसिद्धीच अधिक झाली. त्यानंतर एक कोरोनाबाधित रुग्ण पळून जाताना व्हिडीओ व्हायरल झाल्याने इथल्या गलथान कारभार अधिकच प्रकाशझोतात आला. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची बदली करण्यात आली. त्यानंतर केईएममध्ये एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र कोरोनाबाधितांच्या मोठ्या संख्येमुळे वस्तुस्थिती काय आहे याचे निवेदन महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले. त्यानंतर मुंबईकरांना सुखद धक्का देणारी आणि डॉक्टर
, नर्सेस यांच्या सेवेचे अनमोल महत्त्व विषद करणारी घटनाही सायन रुग्णालयात घडली आहे.



बुधवारपर्यंत सायन रुग्णालयात कोरोनाबाधित १०३ गर्भवती प्रसूत झाल्या. अर्थात त्यांच्या अर्भकांना कोरोनाचा संसर्ग असण्याची भीती होती. पण डॉक्टर आणि नर्सेस यांनी रात्रंदिन डोळ्यांत तेल घालून केलेल्या उपचारांमुळे या अर्भकांना संसर्ग सोडाच
; साधा लवलेशही आढळला नाही. त्यामुळे डॉक्टर नर्सेस यांच्या सेवेचे मोल शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. या १०३ गर्भवतींपैकी ४८ महिलांची साधारण प्रसूती झाली, तर ५५ महिलांचे सिझेरियन करावे लागले. कोरोना ही जागतिक महामारी ठरत असताना आणि त्याच्यावर कोणतेही औषध नसताना हजारोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांमध्ये दुर्दैवाने काही शेकडांच्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यामुळे आठ आठ दिवस रुग्णसंख्येत गढलेल्या आणि स्वतःचे घरदार विसरलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांची मेहनत दुर्लक्षून चालणार नाही. त्यातच कोरोनाबाधित गर्भवतींच्या उदरी निकोप, सृदृढ बाळे जन्माला येणे म्हणजे या कोरोना योद्ध्यांचे निर्भेळ यश मानता येईल. त्यामुळे सायन रुग्णालयाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनही बदलला आहे.

@@AUTHORINFO_V1@@