वुहानमधील सर्व रहिवाशांची पुन्हा होणार कोरोना चाचणी!

14 May 2020 17:18:41

Wuhan_1  H x W:


चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट; खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्यांची पुन्हा होणार चाचणी


बीजिंग : चीनमध्ये तब्बल ३५ दिवसांनी पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. चीनमध्ये एका दिवसात तब्बल १५ कोरोनाग्रस्त सापडले असून, त्यातील ८ जणांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. पुन्हा आढळलेल्या रुग्णांमुळे चीनची आरोग्य व्यवस्था सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून वुहान प्रांतातील १.१० कोटी लोकांची पुन्हा कोरोन चाचणी केली जाणार आहे.


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सात नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एक रुग्ण बाहेरून आला होता, तर सहा लोकांना स्थानिक पातळीवर संसर्ग झाला होता. लक्षणे नसलेले आठ नवीन संसर्गित रुग्णही आढळले आणि अशा रुग्णांची संख्या आता ७५० वर पोहोचली आहे.


आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहान येथे मंगळवारी कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाहीत, परंतु वुहानमध्ये लक्षणे दिसून न आलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५९८ वर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत वुहानमधील सर्व लोकांची तपासणी केली केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0