कोरोनाबाधित जवानाची गळफास लावून आत्महत्या

13 May 2020 13:00:56
Indian army_1  

जवानाला नुकतेच झालेले कर्करोगाचे निदान; आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय


दिल्ली : कोरोना संक्रमित भारतीय सैन्याच्या जवानाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास नरैना येथील आर्मी बेस रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केली. हा ३१ वर्षीय जवान मूळचा महाराष्ट्रातील सांगलीचा असून सध्या तो राजस्थानमधील अलवर येथे तैनात होता.


सदर जवान दीर्घ काळापासून फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होता. उपाचारांदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. पोलिसांना मृताकडून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. बेस सृग्नालायाच्या शवागारात या जवानाचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. नरैना पोलिसांनी या जवानाच्या’ नातेवाईकांना यासंदर्भात माहिती देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याने त्याने असे कठोर पाऊल उचलले असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.


पोलिस अधिकारी म्हणाले की मृताचे कुटुंब सध्या राजस्थानमधील अलवर येथे राहत आहे. जवान अलवर येथे तैनात होता, तो तेथील सिग्नल मॅन होता. त्याला नुकतेच फुफ्फुसाचा कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारादरम्यान त्याला कोरोनाचादेखील संसर्ग झाला. त्यांच्यावर प्रथम आरआर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि नंतर ५ मे रोजी बेस रुग्णालयात दाखल केले.


मंगळवारी सकाळी नारायण येथील सैन्याच्या तळावरील जवानांनी या जवानाचा मृतदेह कोरोना वॉर्डच्या मागील झाडावर लटकलेला पहिला. रात्री एकच्या सुमारास या जवानाला बाहेर शौचविधीसाठी जाताना तेथील लोकांनी पहिले होते. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर पहाटे चार वाजता पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून या प्रकरणाचा तपास सुरु केला. गुन्हे पथकाने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. नातेवाईकांची चौकशी केल्यानंतरच जवानच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0