मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

    दिनांक  13-May-2020 14:13:55
|
BMC_1  H x W: 0

पीपीई किट, मास्क न मिळाल्याने कचऱ्याच्या गाड्या बीएमसीबाहेर उभ्या करून केले आंदोलन


मुंबई : कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोनावर विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आपल्या जीवावर उदार होऊन नागरकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सफाई कर्मचारीही मोलाचा वाटा उचलत आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याने सफाई कामगारांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. कंत्राटी कामगारांना सुरक्षा किट मिळत नसल्याने त्यांनी मुंबई महापालिकेच्या कार्यालयासमोर अंदोलन सुरु केले आहे.


मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पीपीई किट आणि मास्कचा पुरवठा होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनात नवनिर्माण कामगार सेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. कंत्राटी कामगारांना सुरक्षा किट देणे गरजेचे आहे. जर त्यांना काही झाले तर, याची जवाबदारी कोण घेणार? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी माध्यमातून महापालिकेला विचारला आहे. तसेच कंत्राटी कामगारांना तातडीने सुरक्षा किट पुरवल्या जाव्यात, यासाठी कर्मचाऱ्यांनी महापालिकेबाहेर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून आंदोलन सुरु केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनबाहेर असलेल्या मुख्यालयासमोर कर्मचारी जमले आहेत.


जोखीम भत्ता मिळत नाही, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार विमा सुरक्षा कवचसुद्धा मिळालेले नाही, असा दावा मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.