सेन्सेक्स,निफ्टी तेजीत; शेअर बाजारही वधारला!

13 May 2020 11:10:05
Market_1  H x W


मुंबई : कोरोना संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांचा अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत अपवाद नव्हता. काल अर्थव्यवस्थेला चालना देण्याची घोषणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला आहे. सकाळी ९ च्या सुमारास सेन्सेक्स प्री-ओपन सेशन दरम्यान सुमारे १६०० अंकांनी वधारलेला पहायला मिळाला, तर निफ्टीमध्येही तेजी होती. मुंबई शेअर बाजरात सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या निशाणावर उघडल्याने गुंतवणूक दारांसाठी हा मोठा दिलासा होता. सेन्सेक्सही सकाळी वधारून ३२,८४१.८७ पर्यंत पोहचलेलापहायला मिळाल. तर निफ्टीदेखील ९,५८४.२० पर्यंत पहायला मिळाली.


नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये वोडाफोन आयडिया, आयसीआयसी बँक, बीएचइएल हे स्टॉक तेजीत पहायला मिळाले. दरम्यान काल रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसह उद्योग जगताला दिलासा देत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. आता लोकल बद्दल व्होकल होण्याची वेळ आली आहे, असे म्हणत यासाठी आर्थिक तरतूद म्हणून भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीत आर्थिक चक्र वेगाने फिरवण्यासाठी सुमारे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. थोड्याच वेळात अर्थमंत्रालयाकडून त्यामधील तरतूदींची माहिती दिली जाणार आहे.


आज सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सुमारे ४% वाढ पहायला मिळाली आहे. मागील दोन दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये बाजराला मोठे नुकसान सोसावे लागले होते. आज सुमारे ३० पैकी २७ सेन्सेक्सचे स्टॉक्स हे दिलासादायक स्थितीत पहायला आहेत.
Powered By Sangraha 9.0