चिंताजनक : महाराष्ट्रात कोरोना मृत्युदर अधिक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020
Total Views |

Corona_1  H x W


गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ५३ जण कोरोनामुळे दगावले


मुंबई : मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०२६ नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या आता २५ हजारांच्या टप्प्यावर आली आहे. तर काळ राज्यात ५३ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ९२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना विषाणू संसर्ग आणि मृत्यूंपैकी एकट्या मुंबईत १४९४७ रुग्ण आढळले असून, ५५६ व्यक्तींचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


गेल्या २४ तासांतील ५३ मृत्यूंपैकी २८ मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. तर पुणे आणि पनवेल येथे प्रत्येकी सहा मृत्यू झाले आहेत. यासह राज्यात कोविड १९ मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ९२१ वर पोहोचली आहे. मुंबईसह पुणेदेखील कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे. पुण्यात ३३७७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, १८५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


मंगळवारी मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाची ४२६ नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या १४,७८१वर पोचली आहे, तर २८ रुग्णांच्या मृत्यूने मरण पावलेल्या लोकांची संख्या ५५६ वर पोहोचली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली. २०३ लोकांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत या संसर्गामधून एकूण ३३१३ रुग्ण बरे झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@