पालघर साधू हत्या प्रकरणी आणखी १८ आरोपींना अटक

    दिनांक  13-May-2020 10:21:26
|

palghar_1  H xपालघर प्रकरणाच्या तपास दरम्यान गुन्हे अन्वेषण विभागाची माहिती


पालघर : पालघर साधू हत्याप्रकरणी सीआयडीने आणखी १८ आरोपींना अटक केली आहे. तपास अधिकार्‍यांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविल्यानंतर २४ जणांना गजाआड केले गेले आहे. सीआयडीने अटक केलेले सर्व आरोपी घटनेत प्रत्यक्षरीत्या सहभागी होते. यापूर्वी ११० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील नऊजण अल्पवयीन असून, ते सध्या कोठडीत आहेत, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

जमावाकडून हत्या करण्यात आलेले दोन साधू व त्यांचा चालक १६ एप्रिल रोजी सूरतकडे निघाले होते. चोर असल्याच्या संशयातून गावातील जमावाने त्यांची कार अडवली. त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यातील काही आरोपी घटनेनंतर जंगलात लपून बसले होते. त्यांच्या शोधासाठी ड्रोनचीही मदत घेतली होती. तपासा दरम्यान या आरोपींपैकी एक आरोपी कोरोनाग्रस्त आढळल्याने त्याच्यासह इतर ४४ जणांना जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.