ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५०नजीक

13 May 2020 20:42:15
Thane _1  H x W



ठाणे : लोकमान्‍य आणि वागळे प्रभाग समितीत बुधवारी एकूण २२ रूग्‍ण आढळले तर दिवभरात शहरात ४७ रूग्‍ण आढळले. ठाणे शहरात कोरोनाग्रस्‍तांचा एकुण आकडा आता ८४३ इतका झाला. तर तीन रूग्‍ण मृत्‍युमुखी पडले अूसन आठ रूग्‍ण बरे होईन घरी परतले.

ठाणे शहरातील करोनाग्रस्‍तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजही लोकमान्‍य आणि वागळे प्रभाग समितीत सर्वाधिक रूग्‍ण आढळून आले आहेत. लोकमान्‍य प्रभाग समितीत १५ तर वागळे प्रभाग समितीत ७ रूग्‍ण आढळले तर आज नौपाडा कोपरी प्रभाग समितीत देखील आज ७ रूग्‍ण आढळून आले. 

शहरात आज एकुण ४७ रूग्‍ण आढळले त्‍यात प्रामुख्‍याने लोकमान्‍य, वागळे व नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील रूग्णांची जास्‍त आहे. दिवा प्रभाग समितीत एकही रूग्‍ण आढळला नाही. माजीवडा प्रभागात दोन वर्तकनगर प्रभागात एक, उथळसर प्रभागात सात, कळवा प्रभागात पाच तर मुंब्रा प्रभागात एकुण चार रूग्‍ण आढळले.


लोकमान्‍य नगर प्रभाग समितीत रूग्‍णांचा आकडा आता दोनशेच्‍या पार पोहचला आहे. तर वागळे प्रभागात एकुण रूग्‍ण १४५ इतके तर मुंब्रा प्रभागात १३३ इतके रूग्‍ण आढळून आले आहेत. माजीवडा प्रभाग समितीत ४५, वर्तकनगर प्रभागात ४९, नौपाडा कोपरी प्रभागात ८० रूग्‍ण, उथळसर प्रभागात ६८, कळवा प्रभागात ७५ तर दिवा प्रभागात एकुण ४५ रूग्‍ण आजपर्यंत आढळून आले आहेत. शहरातील एकुण रूग्‍णांची संख्‍या आता ८४३ इतकी झाली असुन आज तीन रूग्‍णांचा मृत्‍यु झाला. तर ८ रूग्‍ण बरे होऊन घरी परतले.



Powered By Sangraha 9.0