'लॉकडाऊन-४'ची माहिती १८ मे पूर्वी दिली जाणार
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. देशाच्या जीडीपीच्या एकूण १० टक्के म्हणजेच २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले. देशातील मजूर, कुटीर उद्योग, कर्मचारी आणि भारतातील प्रत्येक करदात्यांसाठी हे पॅकेज जाहीर करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी देणार असल्याचेही ते म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यातर्फे उद्या या बद्दल विस्तृत माहिती दिली जाणार आहे.
उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, सुलभ कायदे, उद्योग व गुंतवणूक आकर्षित करणे यासाठी हे पॅकेज वापरले जाणर आहे. भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महत्वाचा भाग बनेल. जगातील बाजारात एक महत्वाची भूमीका निभावेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. जगावर आलेल्या संकटात महासत्तांनी आपली नांगी टाकली मात्र, भारतासारख्या देशांतील प्रत्येक सामान्य नागरिकांनी आपली सहनशीलता दाखवली. देशातील श्रमिकांनी या काळात मोठा त्याग केला आहे. त्यामुळे मासेमार, श्रमिक मजूर, कारागीर, व्यापारी आदींचाही विचार केला गेला आहे.
कोरोना संकट काळात ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. 'लोकल'साठी व्होकल बनण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिला आहे. भारतातील उत्पादनांचा प्रसार प्रचार करून खरेदी करण्याचे आवाहन करण्याचे त्यांनी केले. खादी क्षेत्राचा ज्या प्रमाणे भारतीयांनी स्वीकार केला. खादी आज एक मोठा ब्रॅण्ड बनला आहे. त्याच प्रमाणे भारतातील इतर गोष्टींसाठीही आपल्या स्वदेशी वस्तूंचा प्रचार प्रसार बनणे गरजेचे आहे.
'लॉकडाऊन-४'ची माहिती १८ मे पूर्वी दिली जाणार
लॉकडाऊन संदर्भात राज्यांशी झालेल्या चर्चेतून तोडगा काढून चौथ्या टप्प्यात विशेष नियमावली अंमलात आणली जाणार आहे. या टप्प्यात आत्मनिर्भरता आणि नव्या गोष्टी शिकवणारा असेल. नव्या संकल्पशक्तीचा विचार करून आपल्याला पुढे जावे लागणार आहे. कर्मठतेची पराकाष्ठा आणि कौशल्याची पूंजी भारताला आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे आणि ते आपण बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.