आर्थिक पॅकेजचे स्वागत : प्रदीप पेशकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |
Narendra Modi1_1 &nb
 
 



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानची घोषणा केली. भाजप उद्योग आघाडीतर्फे या अभियानाअंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे स्वागत करण्यात आले. एकूण जीडीपीच्या १० टक्के योगदान राष्ट्रातील उद्योगांना आत्मनिर्भर करण्यासाठी दिले जाणार आहे.



 पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र, कामगार क्षेत्र, कुटीर तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना समावेश असेल त्यामुळे उद्योगांच्या अडचणी दुर व्हायला मदत होईल, असे मत भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले आहे. संघटित तसेच असंघटित मजूर, कामगार, क्षेत्रासाठी सुध्दा यात बरेच झुकते माप दिले आहे देणार असल्याबद्दल त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. स्वदेशी उद्योगांना बळकटी येण्यासाठी 'लोकल साठी व्होकल' होण्याचे अवाहन केले आहे. उद्योगांना आर्थिक मदत देण्याच्या घोषणेचे उद्योग जगताकडून स्वागत करत त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@