एकूण १४ हजार मुंबईकरांना कोरोना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |
Mumbai Corona _1 &nb
 
 
 


दिवसभरात ७९१ कोरोनाबाधित

 
मुंबई : मुंबईत सोमवारी ७९१ कोरोनाबाधित आढळले असून एकूण रुग्णसंख्या १४,३५५ झाली आहे. आज १०६ रुग्ण बरे झाले असून कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ३११० झाली आहे. आज २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ५२८ झाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकर चिंतेत आहेत. राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन शिथिल करण्याचा विचार केला जात असताना वाढणारी रुग्णसंख्या त्यात अडथळा ठरत आहेत. महापालिका रुग्णालयांची सध्याची स्थिती, राज्य आणि महापालिका यांच्यातील समन्वयाचा अभाव याचा एकत्रित फटका कोरोना रुग्णांच्या संख्येला बसला आहे.
 
 


दाट लोकवस्तीच्या धारावीत दररोज आढळणारी रुग्णसंख्या घटेल हा आशावाद सध्यातरी फोल ठरत आहे. पंचवीसपर्यंत सापडणारे रुग्ण आता ५० च्याही पुढे गेले आहेत. सोमवारी धारावीत ५७ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या ९१६ झाली आहे. आजपर्यंत २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चोगले चाळ, धारावी मेन रोड, ९० फूट रोड, अबू बकर चाळ, धारावी क्रॉस रोड, धोबी घाट, न्यू म्युनिसिपल चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, गौतम चाळ, मुस्लीम नगर, शास्त्री नगर, सुबोध चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरू चाळ, ढोरवाडा, कुट्टीवाडी, प्रणय अपार्टमेंट, तुळजाबाई चाळ, ट्रान्झिट कॅम्प, सोशल नगर, इंदिरा नगर, अण्णा नगर, कुंटे नगर, होळी मैदान, सकिनाबाई चाळ, महात्मा गांधी सोसायटी, अशोक मिल कंपाऊंड, मिराज कंपाऊंड, शेरवाडी, सिद्धार्थ चाळ, शिवशक्ती नगर, डॉ. बालिगा नगर येथे आज कोरोनाबाधित आढळले.

 
 
दादर येथे ५ नवीन रुग्ण

दादर येथे सोमवारी ५ नवीन रुग्ण सापडले असून तेथे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११४ झाली आहे, तर एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. खान नगर-एन. सी. केळकर रोड, सौराष्ट्र सोसायटी, गुरुप्रभा अपार्टमेंट-सेनापती बापट मार्ग, शिवशक्ती बिल्डिंग-गोखले रोड येथे कोरोनाबाधित आढळले आहेत.


माहीम येथे १८ रुग्ण आढळले

माहीम येथे सोमवारी १८ रुग्ण सापडल्याने येथे रुग्णसंख्या १३७ झाली आहे, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रभात भुवन, नया नगर, अरिहंत टॉवर, न्यू तयब्बा मदरसा, माहीम पोलीस कॉलनी, नया नगर, जनाबाई चाळ, जाधव चाळ, जनता सेवक सोसायटी, नूरानी बिल्डिंग, फोतिमा बिल्डिंग, पारेख महल येथे आजचे रुग्ण आढळले.
 
@@AUTHORINFO_V1@@