कॅबिनेट मंत्र्यांकडे सहा लाखांची बीएमडब्ल्यू : मुख्यमंत्र्यांकडे वाहन नाही ?

    दिनांक  11-May-2020 20:05:35
|
UT_1  H x W: 0
 
 

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली संपत्ती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखस केला. अर्थात त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या संपत्तीच्या आकड्यानेच सर्वांचे लक्ष वेधले आहे. उद्धव ठाकरे यांचे सूपुत्र आदित्य ठाकरे यांनीही यापूर्वी त्यांची अधिकृत संपत्ती जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या बीएमडब्ल्युची किंमत सहा लाख दाखवण्यात आली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
 
 
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण १२५ कोटींची मालमत्ता आहे. मात्र, या संपत्तीत त्यांच्या पत्नी व 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांचाही वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत त्यांच्या तीन बंगल्यांचाही समावेश आहे. मातोश्री हा त्यांचा बंगला, तिथे समोरच उभारण्यात असलेली नवी घराची इमारत तसेच कर्जत येथील फार्म हाऊस, आदी घरांची मालकी उद्धव यांच्याकडे आहे.
 
 
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत पाहता त्यामध्ये त्यांच्याकडे विविध कंपन्यांची भागीदारी आणि त्याचे डिव्हिडंडही आहेत. असे असले तरीही उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे स्वतःचे असे एकही वाहन नाही. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक अर्ज भरताना संपत्ती जाहीर केली होती. त्यांची एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख इतकी होती. १० कोटी ३६ लाखाच्या बँक ठेव, २० लाख ३९ हजारांचे बॉंड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५० हजार), ६४ लाख ६५ हजाराचे दागिने तसेच १० लाख २२ हजार, अशी रक्कम होती. आदित्य यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६७ लाख आणि गुंतवणूक ११ कोटी ३८ लाख असून एकूण १६ कोटी ५ लाख ५ हजार २५८ रूपये ही त्यांची जाहीर केलेली मालमत्ता असल्याचं सांगण्यात आले होते.दरम्यान, लॉकडाऊनच्या दिवसांतही उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब निवडणूक अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावली. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती. मात्र, अर्ज भरताना सहकुटूंब उपस्थित राहणे यावर टीका होत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.