अजिंक्य रहाणे म्हणतो ‘धन्यवाद पोलीस’ !

    दिनांक  11-May-2020 15:43:18
|

Ajinkya Rahane_1 &nb
 
 
मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोणाचा चांगलाच प्रादुर्भाव आहे. देशामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आढळले आहेत. अशामध्ये लॉकडाऊन असतानाही काही ठिकाणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि डॉक्टरांच्या मेहनतीमुळे कोरोनावर आळा घालण्यात यश आले आहे. तरीही अद्याप काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम डावलून गरज नसतानाही सामान्य नागरिक बाहेर पडण्याचा अट्टाहास करत आहेत. अशामध्ये महाराष्ट्र पोलीस मात्र जीवाचे रान करून यांना पांगवण्याचे काम एकरात आहेत. अशा कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने आभार मानले आहेत.
 
 
 
 
 
 
भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने ट्विट केले आहे की, “कोरोनाविरुद्धच्या आपल्या लढतीत दर सेकंदाला आपले रक्षण करणाऱ्या पोलिस फोर्सचा मला खूप अभिमान आहे. तुमचे खूप धन्यवाद.” सध्या पोलिसांवर चालू असलेल्या हल्ल्यांबद्दल देशभरातून निषेध होत आहे. त्यात पोलीसही स्वतःचेह घरदार सोडून स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये मोलाची कामगिरी बजावत आहेत. तसेच, अजिंक्य रहाणेने यापूर्वी समाजभान जपत अनेक जणांना मदतीचा हात पुढे करून कोरोनाच्या काळात गरजूंना मदत केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.