टी-सिरीजमध्ये आढळला कोरोनाग्रस्त रुग्ण!

11 May 2020 15:40:31
T series Office_1 &n

मुंबई महापालिकेने केली संपूर्ण बिल्डिंग सील

मुंबई : देशातील सुप्रसिद्ध कंपनी टीसिरीजमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे या कंपनीचे ऑफिस असलेली संपूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली आहे. या घटनेमुळे या कंपनीमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. या बातमीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेने ही संपूर्ण बिल्डिंग सील केली आहे. या बिल्डिंगच्या केअर टेकरला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कंपनीत हा पहिलाच कोरोना रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे.


टीसिरीज कंपनीच्या तळमजल्यावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही घटना टी सिरिजच्या मुंबईतील अंधेरीच्या ऑफिसमध्ये घडली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार १५ मार्चपासून ऑफिसचे कामकाज बंद करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे यातील काही कर्मचारी आपल्या घरी परत जाऊ शकले नाही.


यामुळे कंपनीने या कर्मचाऱ्यांची ऑफिसमध्येच खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. मात्र यातीलच एकाला कोरोनाची लागण झाल्याने, त्याच्या संपर्कात आलेल्या आणि सध्या ऑफिसमध्ये वास्तव्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीसुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली. यातील अनेकांचे रिपोर्ट्स अद्याप आलेले नाहीत.
Powered By Sangraha 9.0