बेस्ट उपक्रमातील १६ कामगारांची कोरोनावर मात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |
BEST Bus_1  H x

कोरोनामुळे ‘बेस्ट’च्या ५ कामगारांचा मृत्यू


मुंबई : अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या बेस्ट उपक्रमातील ७० कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र १६ कामगारांनी कोरोनावर मत केली असून, ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ४९ कामगारांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


डॉक्टर, परिचारिका, आया, पोलीस आदी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना ऑफिस व घरापर्यंत पोहोचवण्याचे काम बेस्ट उपक्रमातील कामगार सतत करत आहेत. तर मुंबईचा वीजपुरवठा अखंडित सुरु राहावा, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील कामगार ही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना बेस्ट कामगारांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत ७० कामगारांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ५ जणांना जीवही गमवावा लागला आहे. तर १६ कामगारांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर ४९ कामगारांवर उपचार सुरु आहेत.


दरम्यान, आपण अत्यावश्यक सेवेत मोडत असून आपली जबाबदारी पार पाडत आहोत. जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. पावसाळा असो वा मुंबईवर कुठलेही संकट येऊ दे बेस्ट उपक्रमातील कामगार सदैव आपली जबाबदारी पार पाडत असतो, याचा अभिमान असल्याचे कामगारांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@