कांदिवलीत घराची भींत कोसळली

    दिनांक  10-May-2020 10:29:39
|
Dipjyoti Chwal_1 &nb
मुंबई : कांदिवली पश्चिम येथील दलजी पाडा भागात एका दुमजली घराची भिंत कोसळली आहे. रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच या भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक रवाना झाले. दबलेल्या ढीगाऱ्या खालून १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Dipjyoti Chwal_1 &nb 
कांदिवली भागात अशा प्रकारे दाटीवाटीत झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. दुर्घटना झालेल्या घरात दोन कुटूंबे राहत होती. सकाळपर्यंत मदतकार्य आणि ढीगारा हटवण्याचे काम सुरू होते. ढीगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात हलववण्यात आले आहे. मुंबईत चाळीतील घरांमध्ये अशाप्रकारे धोकादायकरित्या बांधकाम उभारण्यात आलेली झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्घटनाग्रस्त भागातील घर हे तब्बल ४० फूटी उंच होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.