जास्त दराने दारू विकणाऱ्यांना दीड लाखांचा दंड

10 May 2020 11:35:04
wine Shop _1  H
 




लखनऊ : छापील किंमतीपेक्षा जास्त दराने सुरू असलेल्या दारूविक्रेत्यांना चाप लावण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. जास्त दराने दारू विक्री करणाऱ्यांना दीड लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये दारूविक्रीची परवानगी काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र, दारूविक्रेते अव्वाच्या सव्वा दरात दारू विकत असल्याचे उघडकीस आले आहे. 
 
उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव (अबकारी) संजय भूसरेड्डी यांनी नवे निर्देश दिले आहेत. पहिल्यांदा जास्त दराने दारू विकताना आढळल्यास ७५ हजार दंड, दुसऱ्यांदा कारवाई झाल्यास दीड लाख आणि तिसऱ्यांदा कारवाई झाल्यास दारूविक्रीचा परवाना रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0