श्रीलंकेनंतर आता ‘या’ देशाने दिले आयपीएल आयोजनाचे निमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2020
Total Views |

IPL_1  H x W: 0
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे देशातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या. तसेच, खेळाडूंनादेखील याचा चांगलाच फटका बसलेला आहे. अशामध्ये आयपीएलची भव्यदिव्या स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. आता बीसीसीआयला श्रीलंकेनंतर संयुक्त अरब इमिरत (युएई) या देशाने आयपीएल आयोजन आमच्या देशात करावे असे निमंत्रण दिले आहे.
 
 
 
‘युएईने बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा घेण्याची ऑफर दिली आहे. आयपीएलची स्पर्धा भारतात होणे सध्या तरी शक्य नाही त्यामुळे ही स्पर्धा परदेशात होऊ शकते.’ असे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी ही माहिती दिली आहे. ‘अर्थात बीसीसीआयने श्रीलंका किंवा युएई या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही.” असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@