पाकिस्तानी सरकारी रेडिओवरून सांगितले जम्मू काश्मीरचे हवामान

10 May 2020 21:17:44

radio pk_1  H x



इस्लामाबाद :
कोरोनाच्या संकटकाळातही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरूच आहेत. पाकिस्तानच्या अधिकृत सरकारी रेडिओ वाहिनीने जम्मू-काश्मीरमधील हवामानाविषयी माहिती देणे सुरू केले आहे. रविवारी रेडिओ पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील हवामानाविषयी बातमी दिली.



radio pk_1  H x


रेडिओवरून श्रीनगर, पुलवामा, जम्मू आणि लडाख येथे किमान आणि कमाल तापमान नोंदले गेले. रेडिओ पाकिस्तान कश्मीरसाठी खास पॅकेज देते. सरकारी टीव्ही वाहिन्यांनीही खोऱ्यात विशेष बुलेटिन दर्शविणे सुरू केले आहे. वास्तविक,पाकव्याप्त काश्मीरचे हवामान भारताने सांगायला सुरूवात केली. पाकिस्ताननेही भारताच्या या हवामान वृत्तास विरोध दर्शविला होता. शुक्रवारी मीरपूर, मुझफ्फराबाद आणि गिलगिटमध्ये पीओकेच्या हवामानाच्या वृत्तास त्यांनी आक्षेप नोंदविला.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत जाहीर केले होते की भारताने जाहीर केलेला राजकीय नकाशा बेकायदेशीर आहे. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचेही त्यात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0