आनंद तेलतुंबडे यांच्या कोठडीत वाढ

10 May 2020 14:05:46
Anand Teltumbade_1 &

 
नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण आणि नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपात अटक असलेल्या आनंद तेलतुंबडे यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. शनिवारी विशेष एनआयए न्यायालयाने २२ मेपर्यंत वाढवली. १४ एप्रिल रोजी अटक झालेल्या तेलतुंबडेंची न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
 
 
 
 
तेलतुंबडे यांना विविध आजार असल्याचे सांगत आवश्यक वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने तेलतुंबडे यांना आवश्यक उपचार देण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भातील अहवाल १५ मे रोजी सादर करण्याचे निर्देश तळोजा तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, मुंबईत एनआयएच्या कार्यालयात एनआयए कोठडीदरम्यान तेलतुंबडे यांची चौकशी करणारा एक अधिकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने तेलतुंबडे यांना शनिवारपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0