धक्कादायक ! मुंबईत कोरोनाबाधितांचा उच्चांक

01 May 2020 22:11:29

corona mumbai_1 &nbs




मुंबई :
मुंबईत शुक्रवारचा दिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा उच्चांकी दिवस ठरला आहे. शुक्रवारी मुंबईत ७५१ कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी ३९९ रुग्ण दोन दिवसांपूर्वी चाचणी झालेले आहेत. शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. सध्या विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या ७६२५ रुग्णांपैकी १५६७ बरे झाले आहेत. आज ९५ जण बरे झाले, तर ५ जण मरण पावले. मृतांची एकूण संख्या २९५ झाली आहे. आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा जाहीर झाला असतानाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडणे म्हणजे आणखी कठोर पावले उचलत लॉकडाऊनची गरज व्यक्त करणारी आहे. आजच केंद्र सरकारने लॉकडाऊन ३ आठवडे वाढविण्याचा निर्णय घेतला.



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २००० अतिरीक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्यात येणार, अशी माहिती आरोग्यमनातरी राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान राज्यात आज एकाच दिवशी उच्चांकी १००८ कोरोनाबाधीत रुग्णांची आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या आता ११५०६ अशी झाली आहे. यापैकी १८७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0