कसोटी क्रमवारीत भारताने गमावले अव्वल स्थान, मात्र...

01 May 2020 21:32:10

icc_1  H x W: 0
नवी दिल्ली : नुकतेच आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. यामुळे आता विराटसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानाला जात आहे. त्यामुळे आता एकदा स्पर्धा सुरु झाल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या स्थानावर पुन्हा घेऊन येण्यासाठी चांगली सुरुवात करावी लागणार.
आयसीसीच्या क्रमवारीमध्ये सध्याच्या माहितीनुसार, मे २०१९ नंतर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची मोजणी १०० टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कसोटी सामने ५० टक्के आहेत. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघदेखील कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टी -२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने प्रथम स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदिवसीय क्रमवारीमध्ये इंग्लंड क्रिकेट संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे आता ११६ गुण आहेत, न्यूझीलंड ११५ गुणांसह दुसर्यां आणि टीम इंडिया ११४ गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसर्याल स्थानावर आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरच
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेमध्ये भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानी आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपमध्ये एकूण ९ संघ सहभागी आहेत. यामध्ये सर्व संघ ६ कसोटी मालिका खेळणार आहेत आणि त्यानंतर अंतिम कसोटी सामना गुणतालीकेच्या आधारे पहिल्या २ संघांमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0