‘हा’ फोटो शेअर करून सचिनने दिल्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020
Total Views |

sachin te_1  H
 
 
मुंबई : १ मे २०२० रोजी महाराष्ट्राचा ६०वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे जागोजागी हा आनंदाचा क्षण अगदी साधेपणाने साजरा झाला. महाराष्ट्राचे हे यंदाचे हिरक महोत्सवी वर्षाप्रसंगी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चाहत्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या जवळचा असलेला सचिनचा फेटेवाला फोटो शेअर करत त्याने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
सचिनने ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने महाराष्ट्राची ओळख असलेला मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधलेला स्वत:चाच फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्याने, आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! जय महाराष्ट्र, असे संदेशही लिहिला आहे. तसेच त्याने त्या ट्विटमध्ये #MaharashtraDay हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.
 
 
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १ मे रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये स्थापन करण्यात आली. याला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०५ हुतात्म्यांचे बलिदान गेलं. यामुळे हा दिवस महाराष्ट्रातील जनतेसाठी जिव्हाळय़ाचा व भावनिकदृष्टय़ा महत्वाचा आहे.
@@AUTHORINFO_V1@@