रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांना कोरोनाची लागण

01 May 2020 16:01:17

Russian PM_1  H



‘कोरोना लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत’ पंतप्रधान मोदींचे ट्विट


रशिया : रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मिशस्टीन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या बातमीमुळे संपूर्ण रशियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिखाईल मिशस्टीन यांनी सध्या संपूर्ण कामकाजाची धुरा उपपंतप्रधानांकडे सोपवली आहे.


रशियालादेखील कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. रशियामध्ये आतापर्यंत तब्बल १०,००० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत १ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.


दरम्यान, पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांनी गुरूवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. यावेळी मिखाइल यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तसेच उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव यांच्याकडे पंतप्रधान पदाची सुत्रे सोपवली. व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशस्टीन यांच्या या प्रस्तावाला संमती दिली.


तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे त्यांना ‘लवकर बरे व्हाल आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे. या कोरोनाविरोधी लढाईत भारत रशियासोबत ठामपाने उभा आहे’ असे ट्विट करत धीर दिला आहे.


Powered By Sangraha 9.0