१२०० कामगारांना घेऊन हैद्राबादमधून पहिली ट्रेन रवाना

01 May 2020 13:15:05

Hyderabad _1  H
 
हैदराबाद : तेलंगाणामध्ये अडकलेल्या हरियाणाच्या तब्बल १२०० कामगारांना आपल्या राज्यामध्ये परत जाता यावे यासाठी लिंगमपल्लीवरून एक विशेष रेल्वे झारखंडच्या हातियाकडे रवाना झाली आहे. तेलंगाणा सरकारने यावेळी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत या कामगारांना घराकडे रवाना केले. गाडीमध्ये बसवण्यापूर्वी या सर्व कामगारांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात आले, तसेच रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
 
कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यानंतर अनेक विस्थापित कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थनकावर उपस्थित होते. महिन्याभराहून अधिक काल लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
 
तेलंगणामधून झारखंडला रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अशाप्रकारच्या कोणत्या गाड्या कुठे सोडल्या जाणार आहेत. यासंदर्भातील निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ज्या राज्यामधून ट्रेन सोडण्यात येणार आहे आणि ज्या राज्यामध्ये ती जाणार आहे अशा दोन्ही राज्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेऊन दिलेल्या आदेशांप्रमाणे पुढील नियोजन केले जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0