
इंदूर : कोरोना विषाणूच्या फैलावला रोखण्यासाठी इंदूरला पूर्णपणे सील करण्यात आले आहे. यादरम्यान मध्यप्रदेशातील एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डॉक्टराचा मृत्यू झाल्याची ही भारतातील घटना आहे. या डॉक्टरच्या मृत्यूनंतर इंदूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी अधिक खबरदारी घेत आहेत. तसेच कोरोना पीडितांवर उपचार करत असलेले डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांचे प्रशासनही विशेष काळजी घेत आहे.
डॉ. पंजवानी हे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांपैकी नव्हते तर त्यांचा खासगी दवाखाना होता. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज आहे. त्यांच्यावर गोकुलदास येथे उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितले आहे. डॉ. पंजवानी यांना गोकुलदासमधून अरविंदोमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक बनली होती. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डॉ. पंजवानी हे इंदूरमधील रुपराम नगर येथे राहात होते. मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधित करोनाचे मृत्यू हे इंदूरमध्येच झाले आहेत. इंदूरमध्ये करोनाबाधितांची संख्या २१३ वर पोहोचली आहे.