रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचाच जीव धोक्यात!

09 Apr 2020 10:23:09
Bhabha_1  H x W

वांद्र्याच्या भाभा रुग्णालयातील ४० कर्मचारी क्वारंटाइन


मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णालयातील जवळपास ४० नर्सेस, लॅब असिस्टन्स आणि पॅरामेडिकल स्टाफला क्वारंटाइन करण्यात आले आहे. महापालिकेने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि हाय रिस्कवर असलेल्या कर्मचाऱ्यांना विलग केले आहे. मात्र रुग्णालयाने इथल्या सर्वच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विलग करण्याची मागणी केली आहे.


‘आतापर्यंत आम्ही हाय रिस्कवर असलेल्या ४० लोकांचं विलगीकरण केलं आहे. त्यांचे स्त्रावनमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत’, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रदीप जाधव यांनी दिली. या रुग्णालयात श्वसनाचा त्रास होत असल्याने शनिवारी एका महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी तिचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला. दरम्यान या रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्याची मागणी केली आहे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.


तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. जर नागरिकांनी मास्क वापरले नाही तर त्यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही पालिकेने बुधवारी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0