‘सिंघम’ म्हणतोय मुंबई पोलीस फक्त आवाज द्या!

    दिनांक  09-Apr-2020 13:16:13
|
ajay devgan_1  

खाकीसह सिंघम तुमच्या सोबत असेल; अभिनेता अजय देवगणकडून पोलीसांचे कौतुक!


मुंबई : ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.


‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड १९ साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’, असे ट्वीट अजय देवगण याने केले आहे.कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणनेची २५ कोटी ५१ लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी १५ कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रुपयांचे योगदान त्याने दिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.