सुनील गावस्करांची लाखोंची मदत

    दिनांक  08-Apr-2020 19:04:28
|

sunil gavaskar_1 &nb
 
 
मुंबई : सध्या जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनचे वातावरण आहे. भारतामध्ये केंद्र तसेच राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. तरीही, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशामध्ये सर्व स्तरांमधून कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी तसेच लॉकडाऊनमध्ये हातावर पॉट असणाऱ्या कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. आता भारताचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सरकारी यंत्रणांना तब्बल ५९ लाखांची मदत केली आहे.
 
 
 
 
 
 
सुनील गावसकर यांनी ३५ लाख रुपये पंतप्रधान निधीसाठी तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २४ लाखांची मदत केली आहे. याबद्दल मुंबईचे माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. याआधी सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा या मुंबईकर खेळाडूंनी करोना विरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.