पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला

07 Apr 2020 09:57:52

Pune_1  H x W:


पुण्यातील ‘हे’ परिसर सील


पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन अलर्ट झालं आहे. या शहरात मध्यवर्ती भागातील जवळपास २० पेठांचा भाग सील केला जाणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत हा सर्व भाग सील असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर अनिश्चित काळासाठी मर्यादा येणार आहे.


पुणे शहरातील कोंढवा परिसर, महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय परिसरात सील होणार आहे. त्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भाग सीलबंद राहणार आहे. त्यामुळे या पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. तर कोंढवा परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. त्याशिवाय प्रत्येक नागरिकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.


तर पुढील काळात टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागात देखील हे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘या’ पेठा मध्यरात्रीपासून सील

  • महर्षीनगर
  • मुकुंदनगर
  • स्वारगेट
  • घोरपडी
  • भवानी पेठ
  • रविवार पेठ
  • शुक्रवार पेठ
  • शनिवार पेठ
  • गुरुवार पेठ
  • मंगळवार पेठ
  • सोमवार पेठ
  • रास्ता पेठ
  • कसबा पेठ
  • नाना पेठ
  • कासेवाडी
  • हरकानगर
  • नारायण पेठ
  • सॅलिसबरी पार्क
  • कोंढवा
  • शिवाजीनगर
  • कमला नेहरू हॉस्पिटल
  • केईएम हॉस्पिटल परिसर
  • गणेश कला क्रीडा
  • दत्तवाडी पोलीस स्टेशन परिसर
  • बिबवेवाडी
  • गुलटेकडी
  • सहकार नगर
  • पर्वती
  • लक्ष्मी नगर
  • गोळीबार मैदान, एपीएफ कार्यालय
  • आरटीओ ऑफिस आणि पुणे स्टेशन

या भागात गेल्या दोन दिवसात पुण्यात ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय कोंढवा परिसरात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सीलबंद परिसरातून कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आणि मालाची आवक जावक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0