भेटा 'कोविड'ला; मेक्सिकोमध्ये क्वारंटाईन काळात जन्मलेला वाघ

07 Apr 2020 22:04:36

tiger_1  H x W:

जगभरात 'कोविड-19' म्हणजेच कोरोना व्हायरसचा हाहाकार असताना 'कोविड' हे नाव आशा दर्शवत असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे म्हणणे आहे.

 
 
 
 
 
 
'बंगाल टायगर' प्रजातीच्या वाघाचे हे लहान पिल्लू त्याच्या 'कोविड' या नावामुळे प्राणघातक वाटत असले, तरी त्याच्या जन्मामुळे मेक्सिकोच्या प्राणिसंग्रहालयाला कोरोनाशी लढण्यासाठी आशा निर्माण झाली आहे.

tiger_1  H x W: 
 
 
 
 
 
गेल्या महिन्यात मेक्सिकोमधील वेराक्रुझ प्रांतातील 'आफ्रिका बायो झू'मध्ये या पिल्लाचा जन्म झाला. लाॅकडाऊनमुळे लोक घरीच असल्याने खाजगीरित्या चालणाऱ्या या प्राणिसंग्रहालयाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत वाघाच्या पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे त्याचे नाव 'कोविड' असे ठेवण्यात आले.
 
tiger_1  H x W: 
 
 
 
 
 
'कोविड'चा जन्म प्राणिसंग्रहालयाच्या परिवारासोबत माझ्या कुटुंबासाठी अविस्मरणीय भेट असून कोरोनाच्या सावटाखाली हे आशादायी असल्याचे, प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यक किटझिया रॉड्रिग्झ यांनी सांगितले. त्यांचे कुटुंब या प्राणिसंग्रहालयाचे मालक आहेत.

tiger_1  H x W: 
 
 
 
 
'कोविड' हे जरी एका जीवघेण्या व्हायरसचे नाव असले, तरी ते आशादायी आहे. कारण, या व्हायरसने आपल्याला स्वत:ची काळजी घ्यायला शिकवल्याचे रॉड्रिग्झ सांगतात.
 
tiger_1  H x W:
 
 
 
 
कोविड आता चालण्यासाठी धडपड करतो आणि भूक लागल्यास दुधाची मागणी करण्यासाठी आपली जीभ बाहेर काढून संकेत देतो.

tiger_1  H x W: 
 
 
 
 
 
'कोविड'च्या आईला सर्कसमधून वाचविण्यात आले होते. तिच्या नितंबांमध्ये दुखापत असल्यामुळे तिला गर्भवती राहणे अवघड झाले होते. ती गर्भवती असल्याची कल्पना प्राणिसंग्रहालयात कोणालाच नव्हती.

tiger_1  H x W: 
 
 
 
 
कोविडचे इतर भाऊ जन्माच्यावेळीस आईच्या नितंबांमधून बाहेर पडू शकले नाहीत. कोविड हलका असल्याने तो आईच्या नितंबांमधून बाहेर पडला. जन्मावेळी त्याचे वजन १.४ किलोग्राम होते.

tiger_1  H x W: 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0