अहमदनगरमध्ये ३५ तब्लीगींवर गुन्हे दाखल

07 Apr 2020 12:27:11


tabaligi _1  H

अहमदनगर : दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजला उपस्थित राहिल्यानंतर अहमदनगर येथील मशिदीत लपून बसलेल्या ३५ तब्लीगींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


अहमदनगर पोलिसांनी एकूण ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून हे सर्व तबलिगी जमातचे कार्यकर्ते आहेत. हे ३५ लोक दिल्लीत तब्लीगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यात २९ परेदशी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी नागिरकांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आहे. दिल्लीवरून परतल्यावर त्यांनी नगरच्या स्थानिक आसरा घेतला होता. या लोकांनी त्यांच्या दिल्लीवारीबद्दल स्थानिक पोलिसांना माहिती दिली नव्हती
, असे अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. ४ परदेशी नागरिक आणि १४ स्थानिक लोक त्यांच्या संपर्कात आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0