गलिच्छ कृत्यांचे पाठीराखे कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2020
Total Views |


tabaligi jamaat_1 &n

 


अनेक पाठीराखे 'तबलिगीं'सारख्यांना मिळत असतात, ज्यांना 'जमात-ए-पुरोगामी' म्हणतात. 'तबलिगीं'च्या विघातक आणि घाणेरड्या कृत्यांचा एकेक करुन उलगडा होऊ लागला, त्यावेळी देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी बुद्धिमंत एकतर डाराडूर होते किंवा गुळमुळीतपणे मोजून-मापून शब्द वापरत होते.


कोणत्याही युद्धात तुमच्याकडून होणारी छोटीशी चूकदेखील मोठी सिद्ध होऊ शकते आणि तुमची ती चूकच शत्रूची ताकद वाढवत असते. बिगरमुस्लिमांना इस्लामशी जोडण्याचे आणि मुस्लिमांना 'सच्चा मुस्लीम' करण्याच्या नावावर कट्टरपंथाच्या रस्त्यावर चालण्याचे शिक्षण देणाऱ्या 'तबलिगी' जमातीने तेच काम केले आणि भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्यावर मोठा आघात केला. केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वेळेवर पावले उचलली, ज्यामुळे कोरोनाला आळा घातला जाईल, असे वाटू लागले. मात्र नेमक्या त्याचवेळी 'तबलिगी' जमातीच्या म्होरक्याने आपली धर्मवेडी, धर्मांध मानसिकता दाखवत हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला आणि परिस्थिती बिघडली. मरकजच्या कार्यक्रमात सामील झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या देशभ्रमणामुळे राज्याराज्यांतील स्थिती अधिकच चिघळली. १४०० वर्षांपूर्वीच्या अंधकारयुगाचे अनुकरण करणाऱ्या 'तबलिगी' जमातीने आपल्या कृत्यातून देशाला मोठ्या संकटात टाकले. आज देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये 'तबलिगी' जमातीच्या सदस्यांची संख्या १४०० पेक्षा जास्त आहे. अर्थात, ही समोर आलेली आकडेवारी असून अजूनही कितीतरी ठिकाणी कितीतरी 'तबलिगी' दडून बसले आहेतच. प्रशासन आता त्यांनी लपून न बसता कोरोना चाचणी करून घ्यावी म्हणून कुठे आवाहन करताना दिसते, तर कुठे गुन्हे दाखल करू म्हणून इशारा देत असल्याचे दिसते. प्रशासनाच्या आवाहन वा इशाऱ्यांमुळे बिळातले 'तबलिगी' बाहेर येतील तेव्हा येतील; मात्र त्याआधी रुग्णालयांतील 'तबलिगीं'नी मांडलेल्या उच्छादावर कठोर उपाययोजना केली पाहिजे. उपद्रवखोर 'तबलिगीं'ना तसेच सोडण्याची चूक न करता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करुन त्यांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे, जेणेकरुन त्यांची पुन्हा गलिच्छ कृत्ये करण्याची हिंमतच होणार नाही.

 
 

कोरोनाबाधित 'तबलिगी' जमातीच्या अनेक सदस्यांना देशातील निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये दाखल केले असून त्या त्या ठिकाणी त्यांनी माणुसकीला काळिमा फासण्याचेच प्रकार केले. उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर थुंकण्यापासून ते महिला कर्मचाऱ्यांसमोर नागडे फिरणे, त्यांच्यासमोर अश्लील भाषेचा वापर करण्याचे घृणास्पद उद्योग 'तबलिगीं'नी केले. आता मात्र 'तबलिगी' जमातीच्या सदस्यांच्या अंगात सैतानाने प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून त्याचा नमुना दिल्लीतील नरेला येथे तयार केलेल्या क्वारंटाइन केंद्रात दिसला. नरेलातील क्वारंटाइन केंद्रातील दोघा 'तबलिगीं'नी आपल्या कक्षाच्या बाहेर उघड्यावर शौच करत विकृतीचा कळस गाठला. तसेच स्वच्छता कर्मचारी तिथे पोहोचल्यानंतर या 'तबलिगीं'नी त्यांच्याशीही दुर्व्यवहार केला. तथापि, आता मो. फहद आणि अदनान झहीरनामक तबलिगींविरोधात गुन्हा नोंदवला आहे, परंतु, या लोकांना अशाप्रकारे वागण्याची प्रेरणा, हिंमत कुठून मिळते? तर 'तबलिगी' जमातीच्या मौलाना मोहम्मद साद कंधालवी याने दिलेली चिथावणी, अनेक मुल्ला-मौलवींनी कोरोनाचा कुराणाशी जोडलेला संबंध आणि कोणीतरी 'अल्लाह अल्लाह' करणाऱ्या कबुतराचा कुठलातरी अवयव खाल्ल्यास कोरोनापासून मुक्ती मिळण्याची सांगितलेली कथा, अशा सगळ्यांतून नियम, कायदा, पोलीस-प्रशासन, सरकार आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धाब्यावर बसवण्याची प्रेरणा, हिंमत त्यांना मिळत असते. मात्र, ही केवळ त्या त्या मुल्ला-मौलवी वा धर्ममार्तंडांची उदाहरणे झाली. परंतु, त्याबाहेरही असे अनेक पाठीराखे 'तबलिगीं'सारख्यांना मिळत असतात, ज्यांना 'जमात-ए-पुरोगामी' म्हणतात. 'तबलिगीं'च्या विघातक आणि घाणेरड्या कृत्यांचा एकेक करुन उलगडा होऊ लागला, त्यावेळी देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी बुद्धिमंत एकतर डाराडूर होते किंवा गुळमुळीतपणे मोजून-मापून शब्द वापरत होते. खरे म्हणजे स्वतःला 'विचारवंत' वगैरे म्हणवून घेणाऱ्या टोळक्याने आपला वैचारिक बाणा दाखवून देत 'तबलिगीं'विरोधात ठोस भूमिका घ्यायला हवी होती. 'तबलिगीं'सारखे प्रकार एखाद्या यात्रा, जत्रा अथवा वारीत घडले असते तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या या लोकांनी थयथयाट केला असता. बहुसंख्य हिंदूंना सरसकट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन अद्वातद्वा भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली असती. पण, आता तसे काहीही न होता 'तबलिगीं'च्या बचावातही अनेक लोक उतरल्याचे दिसते.

 
 

शरद पवारांसारख्या राजनेत्याने 'तबलिगीं'चा प्रकार सारखा सारखा दाखवू नका, असे वृत्तवाहिन्यांना सांगितले. मात्र, पवारांना मानणारे आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी जगात नाव कमावलेली अनेक धेंडे ७० वर्षांपूर्वीच्या घटनांवरुन आजही उरबडवेगिरी करत असतात. तेव्हा त्यांना जे काही झाले ते विसरावे आणि वर्तमानात जगावे, असे वाटत नाही. अनेक प्रसारमाध्यमांनीही 'फॅक्ट चेक'च्या नावाखाली 'तबलिगीं'ची बाजू घेऊन त्यांच्या समर्थनाचे उद्योग केलेले आहेत. अनेक पत्रकार, स्तंभकारांनी 'तबलिगीं'बरोबर हिंदूंवरही टीकेची हौस भागवून घेतली. 'तबलिगी' किंवा धर्मांधांना यातून गैरकृत्ये करायला बळ मिळत असते, पण ते असे बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्यांना समजत नसावे किंवा समजूनही त्यांना तसे करु नये, याची अक्कल आलेली नसावी. तथापि, यातून मुस्लीम समाजाला कोणताही फायदा होत नाही, तर दुष्परिणामच वाट्याला येतात. सोशल मीडियावरील 'तबलिगीं'विरोधातील प्रक्षुब्ध जनमतातून तेच दिसते. 'तबलिगींना गोळ्या घाला, 'तबलिगीं'ना ठेचा,' अशा प्रतिक्रिया आतापर्यंत त्यांना पाठीशी घालण्यातूनच आलेल्या असतात. सोशल मीडियावरील किंवा प्रसारमाध्यमांतील वार्तांकन, व्हिडिओ, पोस्ट्स वगैरेंना अनुसरुन 'जमियत उलेमा-ए-हिंद'ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'तबलिगी' जमातीच्या सदस्यांनी केलेल्या कृत्यांवरुन संपूर्ण मुस्लिमांना दोष देऊ नका, असे 'जमियत'चे म्हणणे आहे. 'जमियत'चे म्हणणे बरोबरच आहे पण, कुठवर? जर 'जमियत उलेमा-ए-हिंद' किंवा आणखी कुठल्या मुस्लिमांच्या संस्था, संघटनांनी आणि वैयक्तिकरित्या प्रत्येक मुस्लिमाने 'तबलिगीं'च्या कृत्यांचा रोखठोक निषेध, विरोध केला तरच! तसे न झाले तर तुमचाही 'तबलिगी' जमातच्या कृत्यांना पाठिंबा आहे, हीच भावना कोणाच्याही मनात निर्माण होईल. म्हणून आधी मुस्लीम समाजातीलच लोकांनी पुढे येऊन 'तबलिगीं'च्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, तसेच सरकारी दिशा-निर्देशांचे पालन करत आपल्या समाजात कोरोनाविषयी जनजागृती, प्रबोधनाचा जागर केला पाहिजे, लपलेल्या 'तबलिगीं'ना पकडून प्रशासनासमोर आणले पाहिजे. तेव्हा कुठे सरसकटीकरण थांबेल आणि कोरोनाविरोधातील लढ्यात आपण सर्व एक असल्याचे दिसेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@