शेअर बाजारात आशेचा किरण! सेन्सेक्स २००० अंशांनी वाढला

07 Apr 2020 18:14:45

Snesex _1  H x




मुंबई : तीन दिवसांच्या सुटीनंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वधारणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२२४ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६२ अंशांवर उसळला. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स २४७६.२६ अंशांनी वधारत ३० हजार ६७.२१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७०८ अंशांनी वधारत ८ हजार ७९२ अंशांवर बंद झाला. गेल्या काही दिवासांपासून सतत घसरणारा शेअर बाजार सावरल्याने गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला.

 

सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होते. दरम्यान, कच्च्या तेलाच्या भावात सुधारणा दिसून आली. कोरोना लॉकडाऊननंतर कोसळलेल्या संकटात कच्चे तेलाचे भाव सुधारत असल्याचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसून आला. येत्या काळात ही तेजी आणखी दिसून येईल, अशी शक्यता गुंतवणूकदांतर्फे व्यक्त केली जात आहे. सौदी अरब आणि रशियातील करारामुळे सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या हप्त्यात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल २१ डॉलरवर येऊन पोहोचले होते. त्यातुलनेत आठडाभरात ४० टक्के तेजी दिसून आली आहे.

Powered By Sangraha 9.0