मुंबई : हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे कुटुंब परदेशात अडकले आहे. एक छोटे शेवचे दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास आजही लोकांच्या लक्षात राहणार आहे. गेले तीन महिने सिंगापूरमधील रूग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते. शनिवारी अग्रवाल वयाच्या ५७व्या वर्षात पदार्पण करणार होते. मात्र आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले.
सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले असून अग्रवाल यांच्यावर पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. सिंगापूरमध्ये त्यांना हिंदू रितीनुसार अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सिंगापूरच्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश अग्रवाल यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी त्यांच्यासोबत सिंगापूरमध्ये होते.